कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित युवा संसद २०२५ या संसदेची निवड प्रक्रिया दि. २२ मार्च २०२५ ला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विद्यापीठ स्तरावर घेण्यात आली व यामध्ये “एक राष्ट्र एक निवडणूक” या विषयावर गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा या छोट्याश्या खेडेगावातील युवक हेमंत वनिता अशोक मेश्राम याने आपले मत भाषणातून विद्यापीठात मांडले व त्याच्या अभ्यासपुर्ण अश्या वक्तव्यामुळे हेमंत ची गोंडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. हेमंत हा गोडपिपरी तालुक्याचा रहिवासी असून तो सध्या स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर येथे व्यावसायिक समाजकार्याचे उच्च पदवीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी असून तो राष्ट्रीय सेवा योजनेचा महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जबाबदारी बजावतोय, हेमंत हा अंतर महाविद्यालय स्तरीय, विद्यापीठ स्तरीय, व विविध खुल्या वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेमध्ये याने बरेच पारितोषिके पटकावले आहे. व हा सामाजिक बांधिलकी असलेला युवक महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असतो, सोबतच समाजातील विविध सामाजिक उपक्रम व स्वराज्यातील गडकोटांचे संवर्धन करण्यासाठी सुद्धा तो हिरहिरीने सहभागी होत असतो. समाजात दिसत असलेल्या समस्यांवर तो वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेतून आपले मत नेहमीच व्यक्त करत असतो व आता त्याची मुंबईच्या युवा संसद मध्ये निवड झाली असून तेथे मुंबईच्या युवा संसदेत आपल्या भागातील व महाराष्ट्रातील ज्वलंत आणि दुर्लक्षित विषयांवर तो आपले कणखर असे मत मांडून त्यावर अंमलबजावणी व्हावी म्हणून आपल्या भाषणातून मत मांडणार आहे.
मी आज घडतोय ते म्हणजे मला माझ्या आयुष्यात लाभलेले सर्व मार्गदर्शक वर्ग व प्रियजन यांच्या प्रेमामुळे आज इथपर्यंत पोहोचलो आणि समोरही जाणार कारण माझ्या सोबत माझ्या आई वडील व गुरुजन वर्ग सोबत आहेत तसेच आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ.जयश्री कापसे मॅडम आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्राध्यापक संतोष आडे सर व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे मी आज या पायरी पर्यंत पोहोचलो या सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे व मला जी सामाजिक बांधिलकीची जाण करून दिली त्याचे भान ठेवून मी पूर्णपणे काम करण्यास तत्पर आहे असे हेमंत नी आपले मत व्यक्त केले.

