कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे 7744022677
संपूर्ण माहिती अशी की आज दिनांक 24,3,2025 पासून ऊस तोडी पूर्णपणे बंद झाली आहे व तसेच ऊस तोडी वाल्यांनी आनंदाने घराकडे जाण्यासाठी प्रस्थान केले आहे. या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावातील उत्कृष्ट पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी ऊस तोडी वाल्यांची मुलाखत घेऊन त्यांना त्यांचा 5 ते 6 महिन्यांचा ऊस तोडीचा प्रवासा विषयी चौकशी केली. ठिकठिकाणी बिबट्याचे प्रमाण असून देखील आम्ही कामासाठी सज्ज होतो असे ऊस तोडी कामगारांनी त्यांना सांगितले.व त्यांना त्यांचे हलकीचे जीवन जगत असताना ऊस तोडी क्षेत्रात त्यांना खूप आनंद वाटत होता.कारखान्याकडून प्रत्येक गाडीवाल्यास 2000 रुपये बक्षीस मिळालेले आहे. व काही ऊस तोडी कामगार यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी यांचे आभार व्यक्त केले आहे.

