कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहीम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 9860910063,7620208180
कोपरगाव तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र मध्ये गाजलेले असे दोन नेते शंकररावजी कोल्हे साहेब व शंकररावजी काळे साहेब त्यापैकी आज शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणार्थ आज मायगाव देवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांच्या हस्ते वही आणि त्यांचे वाटप करण्यात आले. शंकररावजी कोल्हे साहेब यांची सहकार महर्षी म्हणून ओळख आहे त्यांच्या पश्चात माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील कार्यकर्त्यांनी हे नियोजन केले होते शंकररावजी कोल्हे साहेब यांच्यामुळे तालुक्यातील लाखो कुटुंबांना रोजगार मिळाला त्यामुळे त्यांची ती प्रेरणा आजही जिवंत आहे असे स्मरून त्यांना आज आदरांजली कार्यकर्ते शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी वाहिली त्यावेळेस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद राव गडाख पाटील हे होते सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन केले या कार्यक्रमासाठी संपत ढोमसे, संजय साबळे,संतोष सोनवणे, कैलास वर्पे,दादाभाऊ कासार, सुदामराव गाडे, रामेश्वर गाडे , रंजीत भगत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद भाऊ बैरागी, सदस्य सचिन राव गाडे, शाळेचे मुख्याध्यापक व संपूर्ण शिक्षक स्टॉप विद्यार्थी विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते. स्कूल कमिटीच्या तर्फे सचिन राव गाडे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

