सिद्धार्थ कांबळे तालुका अध्यक्ष भीम आर्मी
लक्ष्मण कांबळे औसा प्रतिनिधी – रमाई आवास योजना,पंतप्रधान आवास योजना, शेत रस्ते विहीर मंजुरी डॉ बाबासहेब आंबेडकर स्वालंबन, आदी पूर्ण झालेल्या अर्धवट असलेल्या कामाची यादी मिळणे करिता निवेदन सादर करण्यात आले.
तालुक्यातील घरकुल शेतरस्ते विहीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजना या सर्व योजनेचे लाभार्थ्यांची यादी मिळणे बाबत भीम आर्मीचे औसाचे बिडियो तथा गट विकास अधिकाऱ्याला निवेनाद्वारे मागणी, मागणीचे विषय खालील प्रकारे औसा तालुक्यातील घरकुल इसवी सन २०२३/२०२४/ व २०२५ या वर्षाची प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना घरकुल मंजूर व पूर्ण झालेली यादी तसेच शेत रस्ते मंजुरी यादी व शेत रस्ते पूर्ण झालेली यादी. विहीर मंजुरी ची यादी व पूर्ण झालेली यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजने अंतर्गत मंजूर निधी व सदर योजनेची वार्षिक निधी किती आहे ? तसेच औसा तालुक्यातील दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामां ची यादी हे सर्व माहिती देण्यात यावी.अशा स्वरूपाचे निवेदन भीम आर्मीचे औसा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी निवेनाद्वारे मागणी केली आहे यावेळी तालुका सचिव प्रभाकर कांबळे, शिंदाळा शाखा सचिव किरण कांबळे वंचित बहुजन आघाडी शहर प्रमुख सदाम पठाण, महादेव कांबळे आदी पदाधिकारी निवेदन सादर करते वेळी हजर होते.
वरील शासकीय कामात मोठ्या प्रमाणत भ्ष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे तरी माननीय गट विकास अधिकारी साहेब यांनी तत्काळ कार्यवाही करून वरील माहिती देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलने करू आसा ही इशारा भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी दिला आहे.

