सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर : ऊर्जानगर वसाहतीत राहणाऱ्या अभिनेत्री ज्योत्स्रा निमगडे यांचा सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूरद्वारे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तुत्ववान महिला म्हणून सत्कार करण्यात आला.
ज्योत्स्ना निमगडे यांना अभिनय कलेची विशेष आवड असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांतून व नाटकांमधून आपली अभिनय कला सादर केली आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत असून त्यांची ह्या क्षेत्रातील कामगिरी वाखाण्याजोगी आहे. आपली नोकरी, घर सांभाळून व अनेक अडचणींवर मात करीत त्या ह्या क्षेत्रात उत्कृष्ट अशी वाटचाल करीत आहेत. त्यांच्या या कामगिरीची सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाने नोंद घेऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मा. डॉ. नंदिनी देवइकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाँ बुक्कावार मॅडम अध्यक्षा संस्कार कलश चंद्रपूर तसेच प्रमुख अतिथी डॉ. पद्मरेखा धनकर मॅडम प्रसिद्ध कवयित्री चंद्रपूर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा भसारकर मॅडम तर संचालन भारती लखमापुरे यांनी केले. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास अनेक मान्यवर व रसिक उपस्थित होते.

