भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात नुकतेच तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ, एजाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आणि शैक्षणिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला चंद्रपूर येथील इन्स्पायर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विजय बदकल प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. विधी महाविद्यालयाचे पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. पंकज काकडे, तीन वर्षीय अभ्यासक्रम विभाग प्रमुख डॉ. अभय बुटले तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रम प्रमुख डॉ. मनीषा आवळे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. विविध क्रीडा स्पर्धा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.
या तीन दिवसीय कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा मंगरूळकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धाचें आयोजन केले. विद्यार्थी प्रतिनिधी संघटना प्रमुख डॉ. पुणेंदू कार यांनी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाची रूपरेषा तयार करून यशस्वीरित्या पार पाडली.
यावर्षी महाविद्यालयातर्फे उत्कृष्ट विद्यार्थी हा सन्मान एल. एल. बी. तीन वर्षीय अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाचे. विद्यार्थी एजाज खान यांना मिळाला तर एल. एल. बी. पाच वर्षीय अभ्यासक्रमात उत्कृष्ट विद्यार्थी हा सन्मान बी. ए. एल. एल. बी. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आर्या ढवले यांना मिळाला. सर्वोत्तम वादविवादकर्ता हा पुरस्कार रितेश बल्की यांना, सर्वोत्तम मुटर हा पुरस्कार श्रेयस गॉगले व कु. ममता मदान या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे उत्कृष्ट रा. से. यो. स्वयंसेवक पुरस्कार निखिल विदुरकर, मयूरी लखमापुरे, गोपाल क्षीरसागर, श्वेता भगत या विद्यार्थ्यांना देण्यात आला. कायदेविषयक जनजागृती समितीतर्फे उत्कृष्ट कायदेशीर मदत स्वयंसेवक म्हणून कुमारी गायत्री उरकुडे आणि जुनेद सैय्यद या विद्याथ्यर्थ्यांना देण्यात आला. क्रीडा विभागातर्फे उत्कृष्ट क्रीडापटू हा सन्मान चंद्रहास वरभे, साबी बेसेकर, रोहन पवार, कल्याणी वासेकर या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमांमध्ये मिस्टर एस. पी. सी. एल. हा बहुमान विधी अंतिम वर्षीय विद्यार्थी श्री. शंतनू गुल्हाने यांना तसेच मिस एस. पी. सी. एल. हा बहुमान एल. एल. बी. द्वितीय वर्षीय विद्यार्थीनी अपेक्षा पिंपळे यांना मिळाला.
यावार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात नृत्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा गीत गायन स्पर्धा, व्यक्तिमत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धासाठी परीक्षक म्हणून विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ऍड. प्रशांत ठाकूर, ऐंड, योगेश इटनकर, प्रा. प्रज्ञा नंदुरकर, ऍड. भाग्यश्री टेकाम, स्वप्निल गैनवार, लकी, श्री. शुभम लोखंडे परीक्षक म्हणून विविध स्पर्धांसाठी लाभले होते. सर्व विजेत्यांना महाविद्यालयातर्फे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रगती बाला, तस्मिया बेग, मृणाली बल्लेवार, स्वयम टिकले, नीतू सिंग, दिया बलगट या विद्यार्थ्यांनी केले. विजय बदकल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच बाकी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रोत्साहन घेण्याचे आवाहन केले. आजच्या विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता तसेच अपयशाने न खचता मार्गक्रमण करत राहवे असे श्री. विजय बदकल यांनी यावेळी सांगीतले. प्राचार्य डॉ. एजाज शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या वार्षिक स्नेहसंमेलन आयोजनाच्या मागची
भूमिका विशद केली. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समाजाप्रती असलेले दायित्व हे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या विविध स्पर्धा एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरते असे प्राचार्य शेख यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक डॉ. पुणेंदू कार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले व सर्वांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी एल. एल. बी. अंतिम वर्षीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी रितेश बल्की व गायत्री उरकुडे यांनी एल. एल. बी. पूर्ण करण्याच्या संपूर्ण प्रवासात आलेल्या अनुभवांचे वर्णन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रेया कानमपल्लीवार आणि कु. आचल वाढई यांनी केले.

