चंद्रपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा – ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव.

0
136

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाचे आयोजन – गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत

प्रणय बसेशंकर
विशेष तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज़

हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा उत्सव यंदाही चंद्रपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गुढी उभारून उपस्थित नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भागवताचार्य संत श्री मनीष महाराज, तुषार सोम, दशरथ ठाकूर, रघुवीर अहिर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, अनिल फुलझेले, रवी गुरनुले, कल्पना बगुलकर, प्रदीप किरमे, आशिष मासिरकर अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, मिलिंद गंपावार, संजय बुरघाटे, अनिल टहलीयानी, पूनम तिवारी, विकास खटी, विनोद शेरकी, संजय निकोडे, अभिजित पोटे, सुप्रिया सरकार, सपना पाल, मंजुश्री कासनगोट्टूवार, श्रुती ठाकूर, वंदना संतोषवार, रामकुमार आकेपल्लीवार, अमोल शेंडे, नकुल वासमवार, जितेश कुळमेथे, राजू जोशी, संजय महाकालीवार, राकेश बोम्मनवार, सुमित बेले, राम जंगम, ईश्वर विरुटकर, ताहीर हुसेन, हर्षद कानमपल्लीवार, पिंटू धिरडे, मयूर बोकरे, शैलेश दिंडेवार, कल्पना शिंदे, शीतल रंगदळ, ऍड. राम मेंढे, ऍड. परमहंस यादव, मुन्ना जोगी, कालिदास धामनगे, राकेश नाकाडे आदींची उपस्थिती होती.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जगदंब ढोल ताशा आणि ध्वज पथक, स्वराज्य वाद्य पथक आणि ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथक, यांच्या दमदार आणि जोशपूर्ण वादनाने सोहळ्याला विशेष उत्साह मिळाला. ठेका धरायला लावणाऱ्या ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणला. गुढीपाडवा उत्सवात विठ्ठल व्यायाम शाळेच्या कुशल खेळाडूंनी सादर केलेल्या नेत्रदीपक मल्लखांब प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना थक्क केले.

यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून, नवीन संकल्प, नवीन उमेद आणि नव्या ऊर्जेचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा विजयाचा आणि चैतन्याचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर विजयाच्या प्रतीक म्हणून गुढी उभारली. आज आपणही ही गुढी उभारून समाजाच्या प्रगतीसाठी, शिक्षण, रोजगार आणि विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात प्रजेचे राज्य होते. त्यांच्या विचारांतून समाजाला नेहमी प्रेरणा मिळत राहावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा आपण संकल्प केला असून, वर्षभरात हा पुतळा तयार करणार असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.

आज कलाकारांनी आपली पारंपरिक कला सादर करून गुढीपाडव्याला एक वेगळीच शोभा आणली आहे. विठ्ठल व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी सादर केलेले मलखांब प्रात्यक्षिक हे आपल्या ऐतिहासिक शारीरिक संस्कृतीचे प्रतीक आहे. अशा कला आणि परंपरांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here