जाम नदी खोरे प्रोडूसर कंपनी यांचा वेअर हाऊस उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न

0
104

सिन्नर तालुक्यातील वावी येथे मका .सोयाबीन. कडधान्य .संकलन. साठवणूक प्रतवारी व विक्री करणे या मंजूर उप प्रकल्पातील 1000 मॅट्रिक टन जाम नदी खोरे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. यांच्या सौजन्याने माननीय माजी सरपंच चेअरमन मच्छिंद्र चिने व अरुण ताजणे व्हा. चेअरमन साहेब यांच्या प्रेरणेने भव्य शुभारंभ सोहळा संपन्न करण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान निवड करण्यात आली व आलेल्या मान्यवरांचे प्रोडूसर कंपनी मार्फत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्घाटन समारंभ माननीय कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य ॲड. माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला आजच्या कार्यक्रमात शिवाजी आमले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, विलास शिंदे संस्थापक अध्यक्ष सह्याद्री फार्म्स, श्रीमती मनीषा ताई पोटे सिन्नर, जाम नदी खोरे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वावी चेअरमन मच्छिंद्र पाटील चीने, व्हॉइस चेअरमन अरुण पाटील ताजणे, संचालक एडवोकेट विलास पगार, नारायण शिंदे, दादासाहेब जाधव, बाळासाहेब नाजगड, दत्तात्रय चासकर,भाऊसाहेब थोरात, नितीन अडांगळे, अर्चना माळी, सौ वनिता नरोडे तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. कंपनीचे चेअरमन मच्छिंद्र पाटील चिने यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here