मन तुझे सूंदर
नाही दुजा भाव
स्वप्नांच्या पलीकडे
सूंदर रहावा गाव।।
खरी माणुसकी जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रशांत रामटेके सर. त्यांनी अतिशय मेहनत करून दिवस रात्र कष्ट करून यश संपादन केले आहे ,ज्या व्यक्तीला खऱ्या परिस्थितीची जाणीव असते अशी लोकच जीवनात खूप मोठी बनत असतात. त्यांची स्वप्नं ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत रामटेके सर होय. ते प्रबोधिनी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आहेत , त्यांच्या बातम्या अतिशय दर्जेदार असतात. ते सर्वांच्या बातम्या घरा घरात पोहोचविण्याचे काम खुपच मन लावून करतात. आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांना प्रत्येक घरात पोहोचविले आहे आणि ते उत्तम पत्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत..
प्रशांत रामटेके सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जसे की आकाशातल्या चंद्राला मानाचे स्थान आहे तसेच रामटेके सर यांचे स्थान अटळ आहे.
प्रशांत रामटेके सर यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सारख्या लाखो कवी कवयित्री यांच्या कविता प्रबोधिनी न्यूज पोर्टल वर कविता प्रसिद्ध केल्या आहेत त्यामुळे सर्व कवी आणि कवयित्रीच्या मनात एक वेगळा आदरभाव निर्माण झाला आहे,
त्यांचे फेसबुक, इन्स्टाग्रामवर जवळ जवळ 25,हजार फॉलोअर्सवर आहेत, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे, आणि या सर्व कार्याची पावती म्हणून त्यांना काल वर्धा येथे sst faishion चे अभिनेत्री श्रीपा तेलंगे, अभिनेते प्रशांत तोतला गायिका अश्विनी रोशन यांच्या हस्ते युवा पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल प्रशांत रामटेके सरांचे सर्वच स्थरातुन कौतुक होत आहे, प्रशांत सर आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

