
विकलांग सेवा संस्था व युवा फाउंडेशनचा उपक्रम
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर – विकलांग सेवा संस्था ऊर्जानगरच्या प्रांगणात गुडीपाडवा व रमजान ईदचे औचित्य साधून ऑटो चालक, बस चालक व या रस्त्यावरून जाने येणे करणाऱ्या वाटसरू, पांथस्ताकरिता कडक उन्हाळ्यात थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चंद्रपूर युवा फाउंडेशनच्या सौजन्याने पाणपोईचा शुभारंभ मा.रविंद्र बोबडे अध्यक्ष चंद्रपूर विज केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्था ऊर्जानगर,श्रीराम पान्हेरकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा समाजभूषण पुरस्कारप्राप्त यांच्या उपस्थित शिक्षिका प्रीती देवतळे व मालू कोंडेकर यांनी जलकुंभाचे विधिवत पूजन करुन व उपस्थिताना मिठाई व जलपान वितरण करून शुभारंभ करण्यात आला.या उपक्रमाला राज नकुल सर व नितीन राव यांचा सहयोग लाभला.
या विधायक उपक्रमाला सर्वश्री देवराव कोंडेकर सचिव विकलांग सेवा संस्था,समाधान पाटील सुरक्षा अधिकारी,राज नकुल सर,अनुष भगत अध्यक्ष युवा फाउंडेशन,वंश निकोसे, वंश पेरसिंगवार, शंकरराव देवतळे , मुरलीधर राठोड, संतोष ताजने, नारायण चव्हाण,सतिश कंदिवार,भाऊराव डुडुरे,संजय जूनारे, चेतन नेवारे, नितीन गरमडे व वसाहतील युवा वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्षल मेश्राम, वेदांत गेडाम , हिमानशू नाकाडे, ऋतुजा कोंडेकर, अशोक खाडे, ऋग्वेद कोंडेकर यांनी परिश्रम घेतलेत.














