स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने नुकताच मातोश्री विद्यालय सभागृहात जिल्हा प्रेरणा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून मा.सूर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष महा अंनिस चंद्रपूर तर प्रमुख मार्गदर्शक मा.विष्णुदास लोणारे राज्य कार्यवाहक बुवाबाजी संघर्ष विभाग, प्रमुख अतिथी महाराष्ट्र अंनिसचे मा.पी.एम.जाधव सर जिल्हा कार्याध्यक्ष,प्रधान सचिव नारायण चव्हाण यांची उपस्थिती होती.
मेळाव्याची सुरुवात अंनिस गीतांनी व पाण्याचा दिवा पेटवून करण्यात आली.यावेळी मुख्य मार्गदर्शक विष्णुदास लोणारे यांनी जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यापूर्वी पदाधिकारी याची कार्य व कर्तव्य करण्याची जबाबदारी बद्दल माहिती दिली.यावेळी चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्वानूमते करण्यात आली. या प्रेरणा मेळाव्याला जिल्हातील साथी जिल्हा पदाधिकारी मा.कैलास गर्गेलवार,पुरुषोत्तम बसुने,
भास्कर सपाट,कविता नवघरे, किसन अरदळे, भैयाजी उईके, देवराव कोंडेकर, दुरेंद्र गेडाम,संतोष दोरखंडे,जितेंद्र कुमार,जे.बी.जुमडे,अशोक खाडे,राजेश नवघरे,अनिल वाघाडे,विठ्ठल खणके,रोहन नागापुरे,शुभम गोमडे,गुलाब जीवतोडे,प्रीतेश जीवने व अन्य सभासदांची उपस्थिती होती.

