निफाड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – निफाड येथील काँग्रेस भवन मध्ये भारतीय बौद्ध महासभेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने निफाड तालुका कार्यकारणी निवड करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होऊन, निफाड तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरचिटणीस शरद भोगे, कोषाध्यक्ष रितेश गांगुर्डे, संस्कार उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे, पर्यटन प्रमुख प्रकाश जगताप ,संस्कार सचिव रत्नाकर सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकारणीची निवडण्यात आली.
यावेळी निफाड तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश संसारे यांची तर उपाध्यक्ष संस्कार म्हणून सुरेश गांगुर्डे यांची तर सरचिटणीस पदी मनोहर अहिरे यांची तर तर कोषाध्यक्ष म्हणून छगन कटारे यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली यावेळी कार्यकारणी मध्ये पर्यटन उपाध्यक्ष निलेश निळे ,संरक्षण उपाध्यक्ष अजय गांगुर्डे ,हिशोब तपासणीस विजयकुमार गजभिये ,तर कार्यालयीन सचिव अविनाश मोरे ,सचिव संस्कार रवींद्र कटारे ,बाळासाहेब सोनवणे सचिव पर्यटन प्रसार म्हणुन अशोक खडताळे शिवनाथ चव्हाण तर संघटक म्हणून युवराज घायवट, गौतम अहिरे बंडू राजगुरू, विठ्ठल निळे ,शशिकांत भोसले ,संजय निरभवणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व ज्यांच्या प्रमुख उपस्थितती मध्ये कार्यकारणी निवडण्यात आली. त्या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुष्प वाहून अभिवादन केले व आपल्या कामाची सुरुवात करण्यात आल्याची घोषणा केली. या अगोदर प्रकाश जगताप यांनी संविधान समर्थक समाज जोडो अभियान याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी पण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी रत्नाकर साळवे यांनी व शेशिकांत भोसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील गीत गाऊ सर्वांना प्रोत्साहन दिले. निवड करण्यात आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस शरद भोगे यांनी केले तर आभार सुरेश गांगुर्डे यांनी केले.

