सिन्नर प्रतिनिधी – सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी गावातील सर्व समाजाच्या तील तरुणांनी एकत्र येऊन गावांमध्ये सामाजिक काम करण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाची स्थापना केली मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ,ग्राम स्वच्छता अभियान, त्याचप्रमाणे पाणी आडवा पाणी जिरवा, यावरती काम करत असताना गणपती उत्सव ,नवरात्री उत्सव, मोठ्या उत्साह मध्ये या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी साजरा करण्यात येतात .या उत्सवा दरम्यान वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात मंडळातील बरेच कार्यकर्ते हे साईभक्त असल्यामुळे मागील पंधरा वर्षापासून दर रामनवमीला पाथरे ते शिर्डी साई पालखी दिंडी निघते याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साई पालखी घेऊन पाथरे तील साईभक्त निघाले आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये ॲम्बुलन्स सेवा वैकुंठ सेवा मोफत पुरवले जाते. मच्छिंद्र चिने सुनील महाले राजेंद्र बिडवे संतोष ढवण संतोष बिडवे अशोक काटे सचिन गव्हाणे अमोल दवंगे, योगेश बिडवे, नितीन सोमवंशी, रवींद्र बिडवे शुभम शेळके प्रसाद चिने राजेंद्र बुब, कुणाल महाले महेश वालझाडे, गौरव साळवे हरिदास साळवे हर्षल दवंगे मयूर, मच्छिंद्र गव्हाणे संदीप बाराहाते, दत्तात्रेय चिने, पांडू चिने आधी मंडळाचे कार्यकर्ते नियोजन करत असतात

