
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.3 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे मेहुणे संतोष उर्फ विक्की श्रीवास्तव यांची पुण्यानुमोदन आणि जाहिर श्रध्दांजली सभा उद्या शुक्रवार दि.4 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता बांद्रा पूर्व येथील जेड गार्डन टॉवर समोर बिल्डींग क्रमांक.50 च्या बाजुला आयोजित करण्यात आली आहे.या पुण्यानुमोदन आणि जाहिर श्रध्दांजली सभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थितीत राहणार आहेत.या पुण्यानुमोदन आणि जाहिर श्रध्दांजली सभेत रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा रामदास आठवले यांचे दिवंगत संतोष उर्फ विक्की श्रीवास्तव हे सख्खे भाऊ होते. दिवगंत संतोष उर्फ विक्की विजय श्रीवास्तव यांचे 27 मार्च 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा पुण्यानुमोदन आणि जाहिर श्रध्दांजली सभेचा कार्यक्रम उद्या दि.4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बांद्रा पूर्व येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. या श्रध्दांजली सभेत दिवगंत संतोष उर्फ विक्की विजय श्रीवास्तव यांच्या पत्नी निर्मला संतोष श्रीवास्तव आणि पुत्र कुमारअभिषेक संतोष श्रीवास्तव यांच्या सह सर्व श्रीवास्तव आणि आठवले परिवार उपस्थित राहणार आहेत. या शोकसभेस रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आठवले आणि श्रीवास्तव परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.














