शिक्षक ज्ञानासोबतच संस्काराचे बीजही रुजवितात – आमदार विजय वडेट्टीवार

0
89

ब्रम्हपूरी येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने महीला मेळावा कार्यक्रम

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज

महीलांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे आजच्या समाजाच्या प्रगतीचा खरा पाया आहे. आधुनिक युगात महिलांनी शिक्षीका, प्राध्यापक, संशोधक, लेखक आणि प्रशासक म्हणून दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून महीलांनी केवळ स्वतःचा विकास केला नाही तर संपूर्ण समाजाला घडवण्याचं कार्यही केलं आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच मुल्यांची शिकवण देणाऱ्या महीला शिक्षकांनी समाजात संस्काराचे बीज पेरले आहे असे प्रतिपादन विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ब्रम्हपूरी येथे जिल्हास्तरीय महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानावरून ते बोलत होते.

पुढे बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिक्षक हे समाज घडविण्याचे काम करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकून अनेक विद्यार्थी मोठ मोठे अधिकारी बनले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना यशात शिक्षकांचे मोठे योगदान आहे, भविष्यात देखील महीलांसाठी असेच कार्यक्रम आयोजित करून शिक्षण क्षेत्रातील महीलांना प्रोत्साहन देत सन्मान करावा. हा मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता शिक्षण क्षेत्रातील महीलांच्या कर्तृत्वाला प्रेरणा देणारा सोहळा बनावा असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अखिल शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अण्णा आडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य क्रिष्णा सहारे, गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, गटशिक्षणाधिकारी मयुर लाडे, सविता पिसे, उर्मिला बोंडे, वृषाली जोशी, अॅड.अंकीता गिरडकर, डॉ.हेमलता नंदुरकर, पुरुषोत्तम गंधारे, विलास आळे, राकेश गोनेलवार हे उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र व विविध प्रकारच्या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सवीता पीसे यांनी केले. तर सुत्रसंचलन वर्षा रिठे व उषा पिलारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here