शोभायात्रेत चमकले झाडीपट्टीतील कलावंत

0
143

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नागभिड: लोकप्रिय आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या संकल्पनेतून श्री. रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागभीड येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनात, डॉ.शेखर डोंगरे यांच्या मार्गदर्शनात, प्रतीक खोब्रागडे व प्रा.राजकुमार मुसणे व स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत कोरिओग्राफर पौर्णिमा तायडे यांच्या संकल्पनेच्या पौराणिक व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्रमय दृश्याद्वारे भक्तीमय सादरीकरण करण्यात आले.पौराणिक देवी ,देवता, वीर महापुरुषांच्या आकर्षक सजावटीच्या देखाव्याच्या शोभायात्रेने नागभीडनगरी दुमदुमली.

राम (प्रणय गेडाम),लक्ष्मण (सुरज राखडे),सीता (टीना उराडे), हनुमान (सुजल शास्त्रकार),कैकयी (प्रणिता कारेमोरे), सुमित्रा (लेजू धोटे), गणेश (तन्मय ठाकरे), शंकर (तन्मय कडूकार ), पार्वती ( लक्ष्मी सिंह),छत्रपती शिवाजी महाराज (जागेश्वर राखडे),अहिल्याबाई होळकर (सुरेखा ठाकरे), लक्ष्मी (पौर्णिमा तायडे ), दुर्गा (मनिषा देशपांडे), गायत्री (पायल कडूकर), प्रीती डहाट,(नूतन निकुरे) सरस्वती (सानिका राणे ), काली (प्रीती उराडे), शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री. या नव दुर्गाचे व राक्षस (चिदानंद सिडाम) यांच्या बहारदार व प्रभावी सादरकरणाने चैतन्यमय भक्तीचे वातावरण निर्माण केले. या देवी, कालीमाता व राक्षसाने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बहारदार नृत्याविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. नागभीड येथील जुन्या बस स्थानकापासून निघालेली ही शोभायात्रा विविध आकर्षक देखावे, झाक्या व नृत्याविष्काराने श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचली. धार्मिक इतिहास पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे. पौराणिक देवी- देवताविषयी आधुनिक पिढीला सजग करणे.

उत्साहाचे वातावरण निर्माण करून नवीन पिढीला चंगळवादापासून दूर करीत धार्मिक नीतीमूल्याकडे आकर्षित करणे. या हेतूने आयोजित शोभायात्रेतील मनमोहक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले. आमदार कीर्तीकुमार भांगडीया व सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. शोभायात्रेत राम नामाचा जयघोष, अलौकिक विविध झाक्याने व रामनामाच्या टी-शर्ट व फेटयामुळे शोभा यात्रेत जल्लोष निर्माण झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here