कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील श्रीराम सृष्टी परिसरात श्रीराम जन्मोत्सव व यात्रा नियोजन सोहळा संपन्न

0
94

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील जगविख्यात झालेली श्रीराम सृष्टी परिसरामध्ये आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्साहा दरम्यान प्रथम श्रीराम प्रभू यांची मूर्तीची भव्य दिव्य स्वरूपात गावातून मिरवणूक काढण्यात आली. व दीप प्रज्वलन करून गोदावरी नदीच्या काठी महिलांच्या हस्ते गंगामैयाची आरती करण्यात आली.

या 20 एकरामध्ये निर्माण झालेले श्रीराम सृष्टी याच्यामध्ये श्रीराम प्रभू . सीता मैया. लक्ष्मण. भ्रमण करताना असा मूर्ती देखावा किशोर रोठे चास नळी यांनी या ठिकाणी दिला. या श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमात बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र शिवलिंग पूजन शिल्प व श्रीराम पंचवटी कडे जाताना त्यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. या उत्साहात गावातील ग्रामस्थ व परिसरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली. या जन्म उत्सवानिमित्त स्वानंद महिला भजनी मंडळ सुनिता चांदगुडे व त्यांचे सहकारी नाशिक यांनी श्रीराम गीतांचा कार्यक्रम सादर केला. आजच्या रोजी पासून श्रीराम सृष्टी परिसर येथे मोठे प्रमाणात दरवर्षी यात्रा उत्सव भरावा यासाठी महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला .खरोखरच श्रीराम सृष्टी परिसर हा पर्यटकांसाठी धार्मिक स्थळ बनलेले आहे. या श्रीराम सृष्टी परिसरात राबणारे श्रीराम मित्र मंडळ सेवाभावी. माय भूमी फाउंडेशन. व जगदंबा महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here