रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी तालुक्यातील आवळगाव येथील मनोहर सखाराम चौधरी (वय ६० वर्ष) हे गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले होते. तेव्हा मोहफुल वेचत असतांना अचानकपणे वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. या मृतक इसमाच्या कुटुंबियांची काॅंग्रेस विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर मृताच्या कुटुंबियांना आपल्या स्वतः कडून देखील आर्थिक मदत दिली. व मोबदला म्हणून मिळणारी शासकीय रक्कम देखील लवकरात लवकर मिळावी यासाठी देखील शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी मृताच्या कुटुंबातील सर्वांच्या प्रकृतीची आस्थेचे विचारपूस करीत काळजी घेण्याचा सल्ला दिला. व संपूर्ण कुटुबांच्या पाठीशी आपण सदैव सर्वतोपरी उभे राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, कृउबा संचालक किशोर राऊत, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

