आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते होणार शुभारं
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – श्री.महाकाली यात्रेला मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज गुरुवारी (१० एप्रिल) आणि उद्या शुक्रवारी (११ एप्रिल) संध्याकाळी श्री. महाकाली मंदिर परिसरात पार पडणार आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाप्रसाद कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या महाप्रसाद वितरण कार्यक्रमात सुमारे २५ हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार असून, आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सायंकाळी करण्यात येणार आहे. यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक चंद्रपूरमध्ये दाखल होतात. त्यांच्या सोयी-सुविधांची जबाबदारी घेण्याचा आणि भक्तिमय वातावरणात सेवा देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर मतदारसंघाच्या वतीने करण्यात आला आहे.
यंदाच्या महाकाली यात्रेत राज्य आणि राज्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल झाले आहेत. यात्रा सुरू होण्यापूर्वीपासूनच भाविकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न केले होते. परिणामी, यात्रा परिसराचा उत्तम विकास करण्यात आला असून, येथे भाविकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, रस्ते, स्वच्छता आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यात्रेला आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी २५ हजार भाविकांना महाप्रसाद वितरित केला जाणार असून, महाप्रसाद वितरणाच्या आयोजनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता व्यवस्थापन, पाण्याची सोय आणि रांगेतून सुरळीत वितरण यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

