मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची आक्रमक भूमिका
स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – राजुरा तालुक्यातील गौरी पवनी या कोळसा खाणीत श्री. बुद्धा या कंपनीला कंत्राट मिळालेले आहे सदर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातील कामगारांना रोजगार देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे 80 टक्के स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा ही भूमिका असताना सुद्धा अतिशय मजुरीने श्री बुद्धा कंपनी व्यवस्थापन या नियमाला डावलून स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात आळमुढ भूमिका घेत आहे. या संदर्भातील काही बेरोजगार युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांची भेट घेतली असता कुलदीप चंदनखेडे यांनी स्थानिक बेरोजगार युवकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जाब विचारण्याकरिता थेट श्री. बुद्धा कंपनी गाठत येणाऱ्या सात दिवसाच्या आत जर आपण येथील स्थानिक बेरोजगार युवकांना आपल्या कंपनीत सामावून घेतले नाही आणि जी. आर नुसार पेमेंट दिले नाही आणि त्याच प्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या मुळे कंपनीतील कामकाज हे मराठी भाषेतच व्हावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका ठेवली आणि सदर आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याचे सर्वस्वी जबाबदार श्री. बुद्धा कंपनी असेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, प्रविन शेवते. क्रिष्णा गुप्ता, शंकर भडके, प्रंशात रामटेके आणि इतर मनसैनिक उपस्थित होते….

