जय मातामाई मंदिराचे भव्य उद्घाटन सोहळा

0
61

मा.खा.डॉ. अशोक नेते यांच्या शुभहस्ते खंडाळा येथे हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर संपन्न

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दि. १२ एप्रिल २०२५ हनुमान जयंतीच्या पावन दिवशी मौजा खंडाळा (ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) येथे भक्तीमय वातावरणात जय मातामाई मंदिराचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या मंगल प्रसंगी मातामाई मंदिराची स्थापना करण्यात आली असून, या मंदिराचा उद्घाटन सोहळा माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या शुभहस्ते, तर माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या प्रसंगी बोलताना मा.खा. डॉ. अशोक नेते म्हणाले, “आज हनुमान जयंतीच्या दिवशी या मंदिराची स्थापना होणे हे अत्यंत पुण्यप्रद आहे. नागरिकांनी या मंदिराचा भक्तिभावाने लाभ घ्यावा. गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मी विविध विकासाभिमुख कार्ये केली आहेत. मात्र आजच्या काळात अशा धार्मिक कार्यक्रमांची नितांत गरज आहे, जे समाजात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतात.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी आपल्या मनोगतातून हनुमान जयंतीच्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या व जय मातामाई मंदिराच्या स्थापनेबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

या उद्घाटन सोहळ्याला खंडाळा सरपंच अर्चना डिंगे, उपसरपंच नंदकिशोर राखडे, ग्रामपंचायत सदस्य अरुण अलोणे, माजी सरपंच नरेंद्र राखडे, गोपी राखडे तसेच खंडाळा गावातील नागरिक, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

जय मातामाई मंदिराचे हे नवे केंद्र भविष्यात गावासाठी श्रद्धेचे, भक्तीचे आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here