
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचे
गाव होते कटगुण
जयंती केवळ स्मरण नव्हे
हे थोर विचारांचे हे परिवर्तन..
पहिली मुलींची शाळा
पुण्यात सुरू केली
साथ होती सहचारिणीची
अक्षरे बोलकी केली..
न्यायासाठी लढा दिला
मांडली गुलामगिरीची व्यथा
समाजासाठी आदर्श तत्व
प्रकाशल्या दाही दिशा..
माज घरातून साऱ्या स्त्रियास
पायावर उभे केले
महात्माच म्हणेल तुम्हास
नाहीच फिटनारे ऋण असे..
नितांत आदर आणि वंदन तुम्हास
ज्योतिबा या नावातच आहे आदर्श खरा
सौ. प्रतिभा श्रीकांत रेगुंडवार
चंद्रपूर














