prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर

0
91

मोजू तरी कशी उंची भिमा
तुमच्या त्या कर्तुत्वाची,
तुम्ही जगाला शिकवलीत
व्याख्या खऱ्या माणूसकीची ॥१॥

लेखणीचा बादशहा माझा भीमराया
देवही नव्हता अन देवदूतही
माणसातल्या माणूसकीचा होता
पुजारी महामानव साक्षातही ॥२॥

समाजपरीवर्तनाचे शस्त्र घेऊन हाती
शिक्षणाचा तुम्ही केला प्रसार,
बाबासाहेब यांचे थोर विचार
उपकार नाही कधी तुमचे फिटणार ॥३॥

कोणाचा जन्म कोणाला
जीवनात काय देऊनी गेला,
बाबासाहेबांचा जन्म खऱ्या
माणुसकीला न्याय देऊनी गेला ॥४॥

जनावरांसारखे होते जगणं
बाबासाहेब माणूस बनवून गेला,
होतो गुलाम एका घासासाठी
आम्हाला बादशहा बनवून गेला ॥५॥

नाकारले ज्या मनूने जीवन
बांधीलेस त्या मनुचे सरण ,
चवदार तळ्याचे जीवन दान
नवभारतासाठी रचिले धरण ॥६॥

दलितांची तलवार होऊनी गेले
अन्यायाविरुध्द प्रहार झाले,
गरिबांच्या झोपडीचे भीमराव
या जगाचा कोहिनूर होऊनी गेले. ॥७॥

ज्या जगाने रडविले महामानवाला
त्या जगाला ते घडवूनी गेले,
वर्गाच्या बाहेर बसूनी सुद्धा
या भारताचे संविधान लिहिले ॥८॥

चंद्रकांत हरिभाऊ खोसे
कामोठे, नवी मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here