11 एप्रिल 1827 साली
एक क्रांतीसुर्य उगवला
क्रांतीची मशाल पेटवून
निद्रिस्त समाज जागविला
जुन्या रूढी वादी परंपरेवर
करून घणाघाती प्रहार
सावित्री ला घेऊन उघडले
स्त्री शिक्षणाचे नवे दार
स्त्रीला सुशिक्षित करण्याचा
उचलला उभयंताने विडा
धैर्याने दिला सगळ्या
अडचणी,संकटाशी लढा
स्त्री पुरुष समानतेचा
पुरस्कार केला
विधवा पुनर्विवाह लावून
नवा आविष्कार केला
अस्पृश्य दलितांसाठी केले
पाण्याचे हौद खुले
सत्यासाठी झिजवूनी देह
बनले महात्मा फुले…..
मनिषा आनंदराव कांबळे
यवतमाळ

