बहुजनांनो ठेवा भीमाच्या
उपकाराची नेहमी जाण
आकाशी उंच झेप घेण्या
दिली आम्हा विद्देची खाण…
दिले भीमानीं ज्ञानाचे
धडे म्हणून आम्ही लागलो
परदेशात शिक्षण घेण्यास
ज्ञानासाठी रात्रंदिवस जागलो…
भीमाच्या त्यागातूनच
वैभव सारे लाभले
मिळवून न्याय देण्या
दिनरात बाबा राबले…
उपकार असे भीमाचे
सूटा बुटात आम्ही राहतो
ऐट अशी बहुजनांची
पाहुनी मनुवादी झुरतो…
तेजस्वी झाली पिढी
रक्तात भरला जोश
बाबा तुमच्या उपकाराचा
मनी ठेऊ आम्ही होश…
संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

