प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – दि. १३ एप्रिल २०२५ राजेदहेगाव भंडारा: परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती निमित्ताने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा दासू एज्युकेशनल सोसायटी, राजेदहेगाव, भंडारा ह्यांच्या कडून गावातील हुशार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, आणि गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शालेय वस्तूचे वितरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव विनंता मेश्राम ह्यांनी संस्थेचे कार्य व शालेय वस्तूचे वितरण वर्ष १५ वे बद्दल माहिती दिली. ह्या २०२५ वर्षी ७० पेक्षा अधिक हुशार व गरजू विद्यार्थ्यांना सहयोग निधी तसेच शालेय वस्तूचे वितरण बद्दल करण्याचे आहे असे उपस्थित विद्यार्थी आणि मानावरांना माहिती दिली. संस्थाचे शुभचिंतक, सभासद, मार्गदर्शक प्रामुख्याने बाबासाहेबांचे अनुयायी मित्रमंडळ द्वारे महाराष्ट्रातील इतर भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रामाणिक प्रयन्त केला जातोय असे सांगितले.
प्रमुखतः ह्या वर्षी १. प्रज्ञा वाहने, अशोकनगर भंडारा: BA-LLB (वर्ष पहिले), हिला स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके वितरण करण्यात येणार आहे. २. साक्षी पंचभाई, राजुरा, चंद्रपूर: BSC (Biotechnology – अंतिम वर्ष), हिला सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके देण्यात येणार आहे. ३. आकाश सपकाळे, पळासखेडे बु. जामनेर जळगाव BA (Political Science), यंग इंडिया फेलो, अशोका विद्यापीठ, ह्याला एकूण रु ४० हजार ची सहयोग निधी देण्यात येणार आहे. ४. विनिशा खरवाल, वर्ग १० वी, हिचे आई वडील हयात नसल्याने ती तिच्या आजी सोबत राहते, हिला तिच्या शिक्षणासाठी ह्या वर्षी एकूण रु. ६ हजार पर्यंत सहयोग करण्यात येणार आहे. ५. ओजल दिनेश टेम्भूर्णे, वर्ग नववी , आणि निजल दिनेश टेम्भूर्णे, वर्ग सहावी, ह्यांचे वडील ड्राइवर असून शिक्षणासाठी मदत पाहिजे आहे, करीता ओजल व निजल साठी एकूण रु. ३५ हजार हजार पर्यंत सहयोग करण्यात येणार आहे सोबत, शालेय वस्तू देण्यात येणार आहे. ७. प्रियांश विजय बागडे, ह्याच्या आई वडिलाची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ह्याला रु. नऊ हजार हजार पर्यंत सहयोग मदत करण्यात येणार आहे.
आजच्या संस्थेच्या कार्यालयात (भंडारा) एकूण ४८ विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय वस्तूचे वितरण करण्यात आले आहे. राज श्यामकुवर, नाक्ष सहारे, अंशुल पाटील, आधी गहाणे, सार्थक वाहने, आहील लोणारे, तानवि नागदेवे, सूर्या बन्सोड, विहान बन्सोड, मैथिली वाहने, अर्णव मेश्राम, जुबेर पठाण, अशरफ पठाण, नुपूर पंचेश्वर, केंद्रा गणवीर, विक्रम मेश्राम, आभा गणवीर, गार्गी चौहान, रुही मेश्राम, तेजस कठाने, त्रिशा रामटेके, आरोही पाटील, प्रज्ञा चौहान, ईशानी गजभिये, अमन कोल्हे, रोहन कोल्हे, ताजुल मेश्राम, वंश हटवार, प्रशांत पंचेश्वर, प्रतीक कांबळे, श्रेया मेश्राम, पारित पटले, नवी चिचखेडे, स्वपन मेश्राम, रृतीक सहारे, अनन्या पाटील, वक्ष सहारे, नावीन्य मेश्राम, जिवेश मारवाडे, प्रियांशी मारवाडे, सुप्रिया दास, मोहप्रिय दास, आर्य मडावी, अंजेल धारगावे, पूर्वी बागडे आणि इतर लाभार्थी होते. शालेय वस्तूमध्ये लॉन्ग नोटबुक व पेन इत्यादी साहित्याचा समावेश होता.
ह्या कार्यक्रमाला सक्सेना, माजी आयुध निर्माणी अधिकारी, चित्रलेखा सक्सेना, रवी कोल्हे जी, लक्षण मेश्राम, श्रीपद गजभिये, ललिता मेश्राम, साहिल मेश्राम, सुबोध गोंदाने आणि इतर गावातील मान्यवर उपस्थित होते. मार्दर्शन सक्सेना तर, संचालन साहिल मेश्राम ने केलाय आणि आभार प्रदर्शन रवी कोल्हेजींनी केला.

