महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेच्या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्थेची उभारणी केली. त्यांनी दिलेले भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचा मजबूत आधार असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे सामाजिक परिवर्तनाची मशाल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकुर, अजय जयस्वाल, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार माजी नगर सेवक रवि गुरनुले, माजी नगर सेविका छबु वैरागडे, पुष्पा उराडे, खुशबु चौधरी, मनोज पाल, जितेश कुळमेथे, राजकुमार आक्कपेल्लीवार, प्रज्ञा बोरगमवार, रंजत ठाकूर, आटो असोसिएशनचे अध्यक्ष मधू राउत, प्रमोद शास्त्रकार, वंदना हातगावकर, सविता दंढारे, विश्वजीत शहा, तपोष डे, हरमन जोसेफ, दिगांबर चिमुरकर, करणसिंग बैस, सुबोध चिकटे, विमल कातकर, आशा देशमूख, निलिमा वनकर, अनिता झाडे, सोनाली आंबेकर, वैशाली मेश्राम, दुर्गा वैरागडे, दिक्षा सातपूते, चंपा बिश्वास, सुजाता कापसे, शालीनी राउत, सपना सातपुते, सविता ब्राम्हणे, भावना बारसागडे, सोनाली ईटनकर, सुषमा तपासे, हेमलता खोब्रागडे, कल्पना दुबे, सुप्रिया सरकार आदिंची उपस्थिती होती.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या दिक्षाभुमीचा विकास करण्याचा आपला संकल्प पुर्ण होत असल्याचा आनंद आहे. येथे जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. या कामाचे भुमिपूजन झाले असुन लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. तर बाबुपेठ येथे आपण भव्य विपश्यना केंद्र तयार करत आहोत. शहरातील 17 बुध्दविहारांमध्ये आपण अभ्यासिका तयार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आजच्या विकसित भारताची पायाभरणी ही बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने घातली गेली असून, त्यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यातूनच हे घटक आज मुख्य प्रवाहात समाविष्ट झाले आहेत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आजही प्रेरणा देतात आणि सशक्त भारताच्या दिशेने मार्गदर्शन करतात असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आंबेडकर जयंती साजरी
जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानामुळेच फुटपाथवर टोपल्या विकणा-या मातेचा मुलगा आमदार झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. आता समाजातील प्रत्येक दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याचे काम आपण करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

