
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय येथे बहुजनांचे कैवारी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती सोमवार ( ता.14 ) ला मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.भारती गिरडकर यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.त्याचप्रमाणे विद्यालयातील शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीसुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.
कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी भिम गितांवर नृत्य सादर केले.काही विद्यार्थिनींनी भाषणाच्या माध्यमातून भीमचरित्रावर प्रकाश टाकला. काही विद्यार्थिनींनी गितामधून भीमरावाची महती सांगितली.ह्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच शालेय शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.शालेय परिसरातील बुद्ध मूर्तीचे आणि स्मुर्तीशेष चंद्रशेखर बागडे यांच्या मूर्तीचे पूजन करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु.अंशू विणकणे हिने मानले.














