prabodhini news logo
Home गडचिरोली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे जयंती साजरी

0
93

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा ” हा संदेश देत समाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे तसेच अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारणारे आणि महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे महान व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे साजरी करण्यात आली.
या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया सेल प्रदेश उपाध्यक्ष नंदू वाईलकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, महसचिव घनशाम वाढई, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चन्ने, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, काशिनाथ भडके, देवाजी सोनटक्के, कुसुम अलाम, दीपक रामने, माधवराव गावड, उत्तम ठाकरे, माजीद सय्यद, रवींद्र चापले, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, रिता गोवर्धन,सुनीता रायपुरे, पौर्णिमा भडके सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here