
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास मंडळ तुमसर जिल्हा भंडारा तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सामूहिक विवाह सोहळ्यात माळी समाजातील वधू-वरांचे एकूण ७ जोडपी विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे या मंडळा तर्फे सन २००६ पासून प्रत्येक वर्षी सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या राबविला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ताराचंद कटनकार तर प्रमुख अतिथी डॉ.परिणय फुके आमदार, सुनील मेंढे (माजी खासदार), डॉ.प्रशांतजी पडोळे (खासदार), बंडूभाऊ बनकर जि.प. सदस्य भंडारा, रमेश पारधी जि.प.सदस्य, भाऊराव तुमसरे सभापती बाजार समिती, मंडळाचे सचिव जोशी नेरकर, उपाध्यक्ष राधेश्यामजी आमकर हे उपस्थित होते.
कुसुमताई कांबळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रास्ताविक सेवकराम किरणापुरे यांनी केले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी परिसरातील असंख्य लोक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील मेंढे यांच्या खासदार निधीतून तयार केलेल्या माळी समाज भवनाचे अतिथिंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विशेष अतिथी नामदेव कांबळे, शंकर राऊत, यादोराव बोरकर,धर्मेंद्र भुते,अमर रगडे, प्रदीप पडोळे, पंकज बालपांडे, राजेंद्र पटले, संतोष वहिले, जयश्री बोरकर, भगवान चांदेवार, तारेंद्र डिंकवार, नरेश ईश्वरकर शिक्षण सभापती, आनंद मलेवार, अमर रगडे, शंकर गिरडकर, मनोज उपरीकर, विनोद कांबळे, देवराव राऊत, रामप्रसाद नेरकर, अतुल नागरीकर, आकाश बनकर, अनिल किरनापुरे, कृष्णा बनकर, कविताताई बनकर, वंदनाताई आमकर, पुष्पा कांबळे, सुनीता नेरकर,ममता आंबेकर, माधुरी देशकर,शितल कांबळे, रत्नमाला नगरधने, यशवंत उपरीकर, शंकर कांबळे, सुखदेव राऊत,राजू नगरधने,आनंद मलेवार, छत्रपती कांबळे, नीलकंठ हजारे, अरविंद गोटेफोडे, आनंदराव कांबळे इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाला अरुण नेरकर, संतोष नगरधने, किशनलाल रहांगडाले, अरुण राऊत, हरिदयाल उपरीकर, अरविंद झेलकर,राहुल राऊत, सोनू शेंडे, प्रदीप बनकर,राहुल शहारे, अस्वेसन राऊत, माधुरी राऊत, आशिष बनकर, रोशन राऊत, पप्पू नागरीकर,अनिल नागरीकर, रीतीक बनकर, कमलेश राऊत, राहुल झेलकर, सुखदेव उपरीकर, यश नागरीकर, गणेश बनकर, अमित बनकर, अंबादास राऊत, गंगाधर बनकर, हरिचंद खरवडे, प्रकाश आमकर, रणवीर उपरीकर,रुपचंद हजारे, तेजराम कांबळे,लालाजी वडतकर, शिव खरवडे, कैलास राऊत, राजू बोरकर यांनी सहकार्य केले.














