चिचखेडा परिसरातील हल्लेखोर वाघ जेरबंद

0
97

आमदार विजय वडेट्टीवारांनी वाघाला जेरबंद करण्याची केली होती मागणी

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी तालुका मुख्यालयापासुन सुमारे २० किमी अंतरावर जंगलव्याप्त भागात चिचखेडा हे गाव वसले आहे. या भागात टी-३ नामक वाघाने हल्ला करून १३ एप्रिल रोजी विनायक विठोबा जांभुळे वय ६० वर्ष रा.चिचखेडा तह. ब्रम्हपूरी यांना ठार केले होते. यापूर्वी देखील ह्या वाघाने एकाला ठार व २ जणांना जखमी केले होते. वाघाचे गावातील पाळीव प्राण्यांवर दिवसागणिक हल्ले वाढतच चालले होते. सदर भागात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचले होते. त्यामुळे ह्या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत चिचखेडा येथील सरपंच संजना घुटके व इतर नागरिक यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन सध्यस्थितीत असलेल्या भीतीयुक्त वातावरणाबाबत आपबिती सांगितली. त्यानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर गंभीर विषयाला अतिशय संवेदनशीलतेने घेत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून लगेच संपर्क साधत सदर हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याबाबत सुचना केल्या. त्यानंतर याबाबत वनविभागाशी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. सोबतच वाघ हल्ल्यात मृत झालेल्या मृतकांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असुन लवकरच मृतकांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने धनादेश देखील देण्यात येणार असल्याचे आमदार वडेट्टीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, काॅंग्रेसचे विधीमंडळ गटनेते, लोकलेखा समीतीचे अध्यक्ष तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर वाघाला जेरबंद करण्याच्या अनुषंगाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन अखेर त्या १५ वर्षीय हल्लेखोर टी-३ वाघाला ब्रम्हपूरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. याबाबत चिचखेडा परिसरातील नागरिकांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे व वनविभागाचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया:-
वाघाला जेरबंद करावे यासाठी मी स्वतः, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी गावातील नागरिकांच्या सह्यानिशी निवेदन वनविभागाला दिले होते. व त्यानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष मी भेटून सदर समस्या अवगत करून दिली असता आमदार विजय वडेट्टीवारांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी वाघाला जेरबंद करण्यात यावे यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
– संजना घुटके सरपंच ग्रा.पं.चिचखेडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here