ब्रम्हपूरी आगाराला ५ नवीन एसटी बसची उपलब्धता

0
92

आमदार विजय वडेट्टीवारांच्या प्रयत्नाचे फलित

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी हे शहर पुर्व विदर्भातील महत्वाचे शहर आहे. शिक्षणाची पंढरी, वैद्यकीय नगरी म्हणून या शहराची विशेष ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. ब्रम्हपूरी शहरातील बस आगारातून शेगाव, उमरखेड, नागपूर, गडचिरोली यांसारख्या ठीकाणी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या धावतात. मात्र आगारात एसटी बस गाड्यांची कमतरता असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

याबाबत आगार व्यवस्थापक यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन याबाबत समस्या अवगत केली होती. सोबतच तालुक्यातील काही गावांमध्ये बस फेऱ्या बंद असल्याने संबंधित गावातील नागरिक व विद्यार्थी यांनी देखील आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदने दिली होती. या निवेदन व मागणीची गांभीर्याने दखल घेत काॅंग्रेसचे विधीमंडळ गटनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी नवीन बस गाड्या ब्रम्हपूरी आगाराला मिळाव्यात यासाठी कसोशीने प्रयत्न करून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू केला. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला. सोबतच भ्रमणध्वनीवर संपर्क करून ब्रम्हपूरी आगारातील एसटी बसची कमतरतेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अवगत करून दिले. त्यावर एस.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ब्रम्हपूरी आगाराला नवीन एसटी बस मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते, काॅंग्रेसचे विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासन व प्रशासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता आधुनिक स्वरूपाच्या ५ नवीन एसटी बस ब्रम्हपूरी आगारात दाखल होणार आहेत. या नवीन बसेस पुणे वरून ब्रम्हपूरीसाठी रवाना झाल्या असून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here