डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर- दिनांक 27/4/2025 ला सकाळी सात वाजता नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार व खमारी गावचे पोलीस पाटील नदीपात्राकडे गस्त लावण्याकरता गेले होते. तिथे त्यांना वाहन दिसले पण कोणतीच कारवाई केली नाही. म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या घेराव कडून त्यांना प्रश्न केले. साहेबना पद्धतशीर उत्तर देता आले नाही म्हणून गावकरी आक्रमक झाले आणि ही घटना मोहाडी पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती देण्यात आली ते लवकरच ताफा घेऊन गावामध्ये आले आणि वातावरण ला शांत केला .पुढचा तपास मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व उपनिरीक्षक कातीकराम दुधकावरा करीत आहे. गावकऱ्याचे मत असे आहे . हे अवैध रेती उपसा चोरीला प्रशासन जबाबदार आहे.पुढे कोणती कारवाई होणार आहे.गावकरी लक्ष ठेवून आहेत.

