मा.भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांचे अहेरी तालुक्यातील, संड्रा गावात भेट

0
3

विवेक मिरालवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
8830554583

अतिवृष्टी व वादळामुळे नुकसानग्रस्त मा.भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी अहेरी तालुक्यातील संड्रा गावास नुकतीच भेट दिली.

या भेटीत पाऊस, जोरदार वारा व अतिवृष्टीमुळे गावात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानाची पाहणी करण्यात आली. नागरिकांचे घरांचे, शेतीचे तसेच पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
ताईंची शासनाकडे मागणी:

1. संड्रा गावातील सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी.

2. गावातील खंडित झालेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा.

3. पुनर्वसन व मदत कार्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत.

संड्रा गावातील नागरिकांनी आपली व्यथा *मा.भाग्यश्री ताईंना* सांगितली असून त्यांनी त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आहेत
आणि लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here