
असा तो विरह आता साहवेना
गेले जळून आयुष्य तुझा किती हा दुरावा….
किती काळ लोटला बघ हा आहे पुरावा
सख्या येशील एकदा पाहण्या हा सोहळा…
दिसशील का कधी तू वळणावरी एकदा
आजही तिथे उभी एकटी मी पुन्हा…
भोवताली माझ्या भेटीच्या खुणा किती
जिथे भेटलो होतो तू अन् मी आठव तरी….
जपली ह्रुदयात अजुन मी प्रीत आपली
विसरला तू….मनी माझ्या आहे अजून ती…
पेटला आता उरात वणवा बघ पुन्हा
राख झाली भावनांची अन् प्रेमाचा काय गुन्हा…
आशालता भोसले
इंदापूर पुणे जिल्हा.














