ज्याचे त्याचे नशीब हे
आपल्याच हाती आहे
जो करील कर्म चांगले
त्याचा उद्धार होणार आहे।।१।।
प्रत्येक जन बोलतो
माझ्या नशिबी नाही
हतबल होते मन ही
मगच तो निराश होई।।२।।
हातातच भाग्य रेषा
दोष कुणा का द्यायचे
नशीबाचा खेळ सारा
याच डोळ्यांनी पहायचे।।३।।
खूप कष्ट केले तर
नशीब ही साथ देते
कष्ट नाही केले तर
नशिबी दुःखच येते।।४।।
माणसाने जीवनात
द्यावे महत्व कामाला
तरच नशीब ही येते
धावत पळत मदतीला।।५।।
चांगल्या कामाचे फळ
जीवनात नक्की मिळते
कष्टाचा जोरावरच मग
नशीब सुद्धा साथ देते।।६।।
हिंमत कधी हारू नका
विश्वास ठेवा स्वतः वर
नशीब नक्कीच बदलते
आपल्या कष्टाच्या जोरावर।।७।।
नातेही असेच असते
बांधून ठेवावे लागते
नशीबाच्या खेळामध्ये
प्रेमच खरी साथ देते।।८।।
नशीब बदलत नाही
कर्म बदलून घ्यावे
आपल्या यशाचा मार्ग
आपणच बदलते जावे।।९।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

