वैशाख पोर्णिमा
ही बुद्ध पौर्णिमा
करतात सारे
थाटात महिमा
बुद्ध पोर्णिमा हा
दिस मंगलम
मायादेवी पोटी
जन्मला गौतम
महान गौतम
शांतीचं स्वरूप
करूणा प्रेमाचं
महा बुद्धरूप.
लोक हितासाठी
संसार त्यागले
गौतमानं सारं
जीवन आर्पिले
बोधीवृक्षा खाली
बसता ध्यानस्थ
गौतमाला झालं
बोधिज्ञान प्राप्त
बोद्ध धर्मबीज
मनी रूजवीले
शांतीचे अंकुर
विश्वात पेरले.
बुद्ध अनुयायी
पुजती तयास
बुद्ध पोर्णिमेला
मानतात खास.
कवी- दत्तात्रय गोपीनाथ भोसले
मु. पो. ईसाद ता गंगाखेड जिल्हा परभणी.

