
वणवा लागतो तेव्हा
चहुबाजूंला धूरच धूर दिसतो
हळूहळू पेटत जाते आग
भडका गवत कवेत घेतो
दूर दूर पसरत जाते आग
घराघरात घुसते आग
श्वास घुसमटतो माणसांचा
जळतात कासवे ,किटक, नाग
माणसे धावतात इकडेतिकडे
जनावरेही पळत सुटतात
कशी आणावी आटोक्यात आग
प्रश्न माणसांना पडतात
किती नुकसान होते
घरेदारे खाक होतात
का आले हे असे संकट
विचारांचे वणवे पेटतात
शत्रृत्वाचे पेटताच वणवे
आग घुमसत राहते मनात
अन् होत्याचे नव्हते होते
कुणी तेल ओतता कानात
शास्वती नाही काही येथे
करत रहावे चांगले कर्म
जोडत जावी माणसे
माणुसकी हाच खरा धर्म
गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा














