
आले दाटून आभाळ
वारे सुटले सुटले
आता येईल पाऊस
नभ मेघांनी दाटले
झरझर मेघधारा
अंगणात बरसल्या
दार लावून घेतले
खिडकीत पसरल्या
मला भावतो पाऊस
सखा साजण वाटतो
घेते मिठीत पाऊस
झुला झुलतो झुलतो
कसा पाऊस हिरवा
फुले सुगंधी झाडात
पाने डुलती झोकात
वारा आपल्या नादात
असा देखणा पाऊस
जेव्हा नभात भरतो
रूप त्याचे पाहून
आनंदीत बळी होतो
सौ.गुलाब अनिल वेर्णेकर,गोवा















