दिवसभर राबून
कष्टाची कामे करून
बाप जेव्हा घरी येतो
तेव्हा बाबा शब्द ऐकून
त्याचा थकवा जातो पळून
बाबा घरी येताच
मुलांना मिळालं हक्काचं खेळणं
त्यांच्या अंगा खांद्यावर खेळून
सुरू झालं उड्या मारणं
बाबा घरी येतात
सुरू झाली गार्हाणी सांगण्यास,
आईची दिवसभराची
अन् शाळेची मजा सांगण्यास
मुले मोठी झाल्यावर
बाबाकडे करतात गुजगोष्टी
सांगतात मित्र-मैत्रिणींच्या
बाबांस गप्पा गोष्टी
असतो मुलांना विश्वास
काही झाले तरी
बाबा आपल्या
बरोबर आहे जरी
बाबा नावाचं रसायन
दिसतं जरी कडक वरून
तरी असतं मुलायम आतून
घेतं ते सदाच सावरून
रेखा डायस, गोवा

