prabodhini news logo
Home गडचिरोली महावितरण कंपनी तर्फे ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी AIMIM आक्रमक पवित्रा घेणार; लाईट...

महावितरण कंपनी तर्फे ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी AIMIM आक्रमक पवित्रा घेणार; लाईट बिलाची करणार होळी

0
150

गडचिरोली जिल्ह्यात महावितरण कंपनी कडून भरमसाठ लाईट बिल लादून ग्राहकांची सर्रास लूट सुरू केली आहे विद्युत ग्राहकांच्या घरी दोन वर्षापूर्वी जे विद्युत उपकरणे वापरली जात होती त्यांचं लाईट बिल साधारण एक हजार ते पंधराशे रुपये इतके होतें आणि आजही तेच विद्युत उपकरणे वापरली जात आहे आणि लाईट बिल दुप्पटीने तिन हजार ते चार हजार रुपये इतका भरमसाठ लाईट बिल लादून ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे एखादा विद्युत ग्राहक दिवस भर बाहेर असल्यानंतर कोणताही विद्युत उपकरणे सुरू नसल्यावर फक्तं रात्री विद्युत वापर करून सुध्दा 3500 रुपये बिल येते तर महावितरण कंपनी कडून ग्राहकांची भरमसाठ लूट केली जाते म्हणुन महावितरण कंपनी आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जागे करण्यासाठी दिनांक 24 जुन रोज मंगळवार ला दुपारी 3.5 वाजता गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात लाईट बिलाची होळी करून महावितरण कंपनी आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे तरी AIMIM पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एमआयएम जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here