प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाकाली कॉलरी व रयतवारी कॉलरी ला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे तिथे बनत असलेला नवीन पुल.. पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून महाकाली कॉलरी परिसरातील लोकांसाठी येण्या जाण्याकरिता हाच एक पुलाचा प्रमुख मार्ग आहे.जेव्हा जास्त पाऊस येतो नवीन पुलाच्या बाजूला असलेला जुना पूल अक्षरश: उथळी भरून वाहतो ज्याच्यामुळे पुलाचे पाणी उतरेपर्यंत महाकाली कॉलरी परिसरातील लोकांना परिसराच्या बाहेर पडता येत नाही. मागील वर्षी काही लोक अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहेत.
तरी येणाऱ्या मुसळधार पावसाची गंभीर दखल घेत आणि महाकाली कॉलरी परिसरातील लोकांची समस्या लक्षात घेत या नवीन पुलाचे उरलेले काम त्वरीत पूर्ण करून लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी नवीन पूल येण्या जाण्या साठी सुरू करावे अश्या आश्याचे निवेदन काँग्रेस चें शहर जिल्हा अध्यक्ष आद.रामु तिवारी जी यांच्या नेतृत्वात महानगर पालिकेचे सन्मानिय आयुक्त यांना निवेदन देन्यात आले..
या प्रसंगी माजी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, माजी नगरसेविका लालिता रेवेल्लीवार, काँग्रेस चे शिरीजकुमार गोगुलवार व अन्य कार्यकर्त्यांची प्रमुख्याने उपस्थिति होती..!

