ॲड.आदर्श अरुणराव जाधव राज्य सचिव, लीगल सेल (महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना) व बीड जिल्हा सत्र न्यायालयातील विधिज्ञ

0
179

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मूल्य, न्याय आणि राष्ट्रविघ्छ यांची त्रिसूत्री अंगी बाळगणारे ॲड. आदर्श जाधव सर हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे राज्य सचिव (लीगल सेल) ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली असून, बीड जिल्हा सत्र न्यायालयात एक जागरूक, प्रामाणिक आणि लढवय्या वकील म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी अनेकदा कायदेशीर लढाया लढल्या आहेत. पोलिस दलातील तरुणांची अडचण, अन्याय किंवा शासकीय अडथळे या बाबतीत ते नेहमी पुढे सरसावले आहेत. संविधाना वर निघ्व ठेवून न्यायासाठी उभे राहणे हेच त्यांचे जीवनध्येय आहे. कायद्याचे रक्षण, पोलीस दलाचे संरक्षण महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांसाठी, समस्यांवरील कायदेशीर सल्ल्‌यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी अनेक जनहित याचिका व कार्यशिबिरे राबवली आहेत. त्यांच्या नावावर अनेक यशस्वी न्यायनिवाडे व सामाजिक कार्यीची उदाहरणे आहेत त्यांची भाषण शैली प्रभावशाली, विचार सुस्पष्ट आणि भूमिका राष्ट्रहितासाठी झपाटलेली आहे. त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी मोफत कायदेशीर सहाय्य देखील उपलब्ध करून दिले आहे. समाजासाठी झपाटलेल नेतृत्व अशा कार्यशील आणि समाजहितासाठी समर्पित असलेल्या व्यक्तिमत्त्वाला संघटनेमध्ये मानाचं स्थान मिळालं नसतं तरच नवल. ॲड. आदर्श जाधव सर हे केवळ वकिली करत नाहीत, तर न्याय मिळवून देण्याचा लढा ते मिशन म्हणून पाहतात. ‘जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, जिथे शोषण तिथे आमचा कायदा’ हे त्यांचे कार्य ब्रीद त्यांच्या प्रत्येक कृतीतून झळकते.

लेखक:विकास श.शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here