तुमसर नगरपरिषद चे अधिकारी गाळ झोपेत…
डॉ सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी,तुमसर – तुमसर शहरच्या सुशिक्षित असणारा गोवर्धन नगर च्या नाली आणि रोडाची दशा पहाणं होत नाही. पाऊस जरी आले की हि दशा नियमित निर्माण होते. दुर्गाबाई दौलतराम ढबाले गोवर्धन नगर यांच्या घरासमोरील हे चित्र आहे. जेव्हाही पाणी पाऊस आले की नालीतली संपूर्णता घाण ही रोडवर येते आणि फार दुर्गंध वास सुरू होतो .आणि या कारण मुळे लोक घाणीच्या वासामुळे आणि दिसणाऱ्या घाणमुळे या नगर तील लोक स्वतःहून पाण्याची बौछार मारून ते गंदगी साफ करतात आणि हे दर पावसाळ्याची दशा आहे . तक्रार देऊन काहीच फायदा होत नाही म्हणून कोणी तक्रार द्यायला तयार होत नाही. आमचे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की साफसफाई वर जास्त भर देणे हे सर्व अधिकाऱ्याची जिम्मेदारी आहे असे सांगतात पण तुमसर नगरपरिषद चे अधिकाऱ्यांना पंतप्रधानाच्या सुद्धा बोलण्याच्या मान ठेवत नाही हे सिद्ध होते.कारण पत्रकार डॉ सुखदेव काटकर हे सांगतात न.प.चे अधिकारी आंधळे व बहिरे आहेत.

