
डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – दिनांक 8/7/ 2025 तुमसर -तुमसर शहरच्या सरकारी दवाखान्यात छताच्या पाण्याची गळतीमुळे प्रसुती गृहात पाणी जमा झाले. शहर मध्ये तीन दिवसापासून सतत पाऊस पडत आहे . दवाखान्यात पाणी खेळते आहे. दवाखान्यात भरती झालेले महिला, प्रसूती झालेले काही महिला आपल्या बाळाला धोका होऊ नये म्हणून जिकडे तिकडे लपवत आहे . रुग्ण महीला व त्यांच्चे नातेवाईक चे हालबेहाल होत आहेत. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मिसुरकर म्हणतात की पुष्कळ आधी याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळ पाठवली होती. दवाखान्याचे बांधकाम कामाचे अभियंता आणि कंत्राटदार यांना सुद्धा कळविण्यात आले होते .कोणीही लक्ष दिलेलं नाही असे अधीक्षक चे म्हणणे आहे. या घटनेमुळे बदनामी आमच्या नशिबात आली असे अधीक्षक म्हणत आहेत .या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. जर लवकरात लवकर ही दुरुस्ती करण्यात आली नाही तर लोक आक्रमक होण्याची शक्यता आहे. स्वास्थ अधिकारी पहिले आंधळे झाले आणि घटणे नंतर डोळे उघडले.हि शरमेच बाब आहे.















