prabodhini news logo
Home ठळक बातम्या तुमसर तालुक्याती गर्भवती महिलेची बेहाल…

तुमसर तालुक्याती गर्भवती महिलेची बेहाल…

0
152

डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर तालुक्यातील तामसवाडी (भे)या गावच्या गर्भवती महिलेचे हाल बेहाल झाले कारण शासकीय बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार हे बेजबाबदार पणाने वागणूक केली आणि काम वेळेवर न करता अपूर्ण सोडून गेले. ही घटना दिनांक 8/7/2025 च्या सकाळची आहे व तामसवाडी (भे) गावच्या रोडची आहे. पवन नेवारे ची पत्नी गर्भवती महिलेला खूप त्रास उमळला. तिला तुमसर सरकारी दवाखान्यात भरती करण्यासाठी ॲम्बुलन्स बोलवण्यात आली. पण सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रस्ता खराब झाले आहे. त्यामुळे ॲम्बुलन्स चिखलामध्ये फसली अखेर गर्भवतीला स्वतः एवढ्या त्रासात ती चांगल्या रोड पर्यंत चिखलातून पायी जावे लागले. फसलेली गाडी गावकऱ्यांच्या मदतीने काढण्यात आली.वेळ असता काम पूर्ण न करून अपूर्ण सोडून गेले म्हणून अभियंता आणि कंत्राटदार या दोघांवर कारवाई करण्यात यावी ही लोकांची मागणी आहे आणि लवकरात लवकर रस्त्याचे दुरुस्ती करण करावे अशी मागणी आहे. नाहीतर आंदोलन करु अशी चेतावणी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here