
मधुर गीत व सत्काराचे आयोजन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७२ वा वर्धापन दिन नुकताच ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील गट कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम पान्हेरकर जेष्ठ समाजसेवक, देवराव कोंडेकर गुणवंत कामगार तथा जिल्हाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, दत्ता बावणे वाहतुक नियंत्रक राज्य परिवहन एसटी विभाग चंद्रपूर, सुरेश तुम्मे ,धमेंद्र कन्नाके, बाबाराव मुन, किसनराव नागरकर गुणवंत कामगार, रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी , भुवनेश्वरी धर्मपुरीवार शिक्षिका यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात गारवा या सुमधुर बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने सर्वांचे मन प्रसन्न झाले.या कार्यक्रमात नुकताच डाँ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त मा. श्रीराम पान्हेरकर व मा.सुनंदा पान्हेरकर या दाम्पत्याचा तसेच सेवानिवृत्त गुणवंत कामगार मा बाबाराव मुन आणि २०२४ चे गुणवंत कामगार मा वंदना मनपे,देवकी कोकास व किसन नागरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मंडळाचा वाढदिवस मोठ्या उत्सावात सर्वांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कामगार/ कामगार कुंटुबीय, आस्थापनाचे मालक पदाधिकारी, परिसरातील नागरीक व मंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होते.















