prabodhini news logo
Home अहेरी झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यकारिणीची स्थापना

झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यकारिणीची स्थापना

0
167

आलापल्ली शहर प्रतिनिधी
त्रिकांत डांगरे (8669198535)

आलापल्ली : झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संघमित्रा बुद्धविहार आलापल्ली येथे अहेरी तालुक्याची झाडीबोली साहित्य मंडळाची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून लक्ष्मण रत्नम तर सचिव संतोष चिकाटे यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी सुमन चव्हाण, दिवाकर मादेशी, कोषाध्यक्षपदी सीता टेकुलवार, सहसचिव म्हणून रचना बोमकंटीवार तर संघटक म्हणून ललिता दहागावकर, अमोल दुर्योधन, संगीता दुधे यांची निवड करण्यात आली.

यावेळी झाडीबोली साहित्य मंडळाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष लक्ष्मण रत्नम म्हणाले, झाडीबोली ही केवळ संवादाची भाषा नाही तर ती आपल्या जीवनशैलीची, आपुलकीची व ओळखीची शिदोरी आहे. तिचे जतन होणे अत्यावश्यक

असल्याचे सांगितले. मनामनात रुजावा, यासाठी कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीतील वर्षा पडघन, संजीव बोरकर, उपेंद्र रोहनकर, मारोती आरेवार, वर्षा राजगडे, रोशनी दाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजीव बोरकर तर आभार मारोती आरेवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here