prabodhini news logo
Home कोपरगाव तिडके विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरविले लोकशाहीचे धडे

तिडके विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरविले लोकशाहीचे धडे

0
503

प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली, निवडले वर्ग प्रतिनिधी

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे-7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाहीचा धडा शिकवला व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाचा प्रतिनिधी निवडला. मंत्रिमंडळ स्थापन करण्याअगोदर मतदानाचे महत्त्व, मतदान प्रक्रिया व ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कशी रुजवली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाचे पालन कसे करावे, यासाठी संविधानाचा आधार घेऊन विद्यालयात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. वर्गमंत्रीमंडळ निवडणूकीचे प्रात्यक्षिक, उमेदवार निवड, उमेदवार यादी, मतदार राजा आणि त्याचे आधारकार्ड ओळखपत्र, बॅलेट मशीन, मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष, सी. आर. सी. प्रोसेस, प्रत्यक्षात मतदान केल्यावर होणारा बीपचा आवाज, मतमोजणी आणि निवडणुकीचा निकाल.. आणि सर्व रेकॉर्डस् याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

निवडणूक आयुक्त म्हणून प्राचार्य श्री. मांडवडे ए.आर. तर सहाय्यक आयुक्त म्हणून पर्यवेक्षक दवंगे एस.यू तर निवडणूक निरीक्षक म्हणून मोरे आर. के. चौधरी एच.एस. व निळकंठ पी.ए. यांनी काम पाहिले. तर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांनी कामाचा अनुभव घेतला. कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटबाबत कामकाज विद्यालयातील सर्व वर्गशिक्षकांनी बघितले. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या या शालेय मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा प्राचार्य मांडवडे ए.आर. यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. शालेय नियमांच्या अधीन राहून आपले काम निष्ठा व प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी पदाचा सुयोग्य वापर करून शाळेची शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता आबाधित ठेवण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी सारबंदे एन. एच, शेख आर. एन, कुशारे डी. एन. राऊत एस. एल, गोडे एस. एम, बागुल जी. एम, थोरात के. जी, सोनवणे एस. व्ही. गुंजाळ बी.व्ही. माळी ए.पी., कदम एन.आर. चौधरी एच. एस. कोल्हे एम.एल. भुजबळ पी.एच. गोपाळे एस. के. कापडणीस एच.डी. लांडगे व्ही.एस. पवार आर.बी. सोनवणे मॅडम, मोहन जाधव, पवार एस. एस. कापसे के.डी. या सर्व सेवकांनी सहभाग घेतला.
हे झाली विजयी
निखिल जाधव (५अ), काव्या सानप (६अ), संस्कृती धात्रक (६ब), साईराज पायमोडे (७अ), आराधना पगारे (७ब), अथर्व चांदगुडे (८अ), वेदांत तनपुरे (८ब), साहिल साळवे (८क), पियुष फरताळे (९अ), प्रशांत जाधव (९ब), आयुष सांगळे (१०अ), शुभम पगारे (१०ब).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here