
व्यासपुजन दिनी संस्कृती
घडवणाऱ्यांचे होई पुजन
वेदव्यासांनी ज्ञानकोषाच्या
विचारांचे केले संकलन …
अभ्युदय नि:श्रेयस दुहेरी
समन्वय अध्यात्म परायण
व्यास जीवनाचे खरे भाष्यकार
नाहीसे करी शिष्यांचे दुर्गुण…
खरा गुरू बसे व्यासपीठावर
सरस्वतीचा खरा उपासक
परंपरागत व्यास गुरूपुजा
संयमता साहित्याचा अभ्यासक…
संस्कृतीत गुरूंचे पूजन
सुमधुर भावाद्रऀ काव्य
शिष्याच्या जीवनात
शांतता शीतलता भव्य…
गुरू साक्षात परब्रह्मसमान
गुरू म्हणजे ध्येयपुजन
गुरू वजनदार मनाचा स्वामी
गुरू अध्यात्म विद्येचे दर्शन….
गुरू म्हणजे ज्ञानाचा सुर्य
प्रेमाचा विशाल महासागर
गुरू पाजी अनमोल ज्ञानामृत
दुर सारी जीवनातील अंधकार …
सौ. स्नेहा मुकुंद शिंपी
नाशिक














